राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज

On: February 12, 2021 11:45 AM

मुंबई : येत्या काही दिवसात राज्यात अवकाळी पावसाची शक्यत वर्तवली जात आहे. महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रासह देशातील मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, कर्नाटकचा अंतर्गत भाग, तेलंगाणा आणि तामिळनाडू राज्यात देखील पावसाचा फटका बसणार असल्याचे म्हटले जात आहे.
विदर्भाच्या वरील भागासह, पूर्व मध्य प्रदेश व छत्तीसगड भागात चक्रीवादळी हवेचे क्षेत्र विकसित होऊ शकते. त्यामुळे तेलंगाणा राज्यातून दक्षिण तामिळनाडूपर्यंत एक ट्रफ

विकसित होण्याची देखील शक्यता आहे. हवामानाच्या या परिस्थितीमुळे अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरामधून भुपृष्ठावर बाष्प आल्याने हवामानात बदल होवून पाऊस पडेल असे हवामान तज्ञ मत व्यक्त करत आहेत. ऐन थंडीत अवकाळी पाऊस आल्यास शेतक-यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment