अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली आणले ड्रग्ज 60 लाखाचे हेरॉईन, गांजा मुंबईत जप्त,आरोपी अटकेत

On: July 3, 2020 10:09 AM

मुंबई: लॉकडाऊन काळात वाहतूक सेवा बंद असतांना देखील मुंबईत 60 लाख रुपयांचा गांजा आणि हेरॉइनची तस्करी करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अली मोहम्मद शफी आलम शेख (60) असे आरोपीचे नाव आहे. त्याने भाजीपाल्याच्या वाहनातून हा माल मुंबईत आणल्याचा संशय स्थानिक गुन्हे शाखेला आहे.

लॉकडाऊनच्या काळात चित्ता कॅम्प परिसरातील रहिवासी अत्यावश्यक सेवेच्या आड लपून छपून ड्रग्जचा साठा मुंबईत आणत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली. कक्ष ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईची सुरुवात झाली. पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ, सपोनि विनोद माळवे, राजेश पाटील, बिभीषण गव्हाणे आणि अंमलदारांनी हा तपास सुरू केला.

बुधवारी एक इसम चित्ता कॅम्प परिसरात लाखोंच्या हेरॉइन आणि गांजा विक्रीसाठी येणार असल्याचे पथकाला समजले. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment