मुंबई : जीएसटी कर प्रणालीतील जाचाच्या विरुद्ध देशातील चाळीस व्यापारी संघटना एकत्र येत 26 फेब्रुवारी रोजी व्यवसाय बंदची हाक देण्यात आली आहे. कॅट अर्थात कोन्फेडरेशन ऑफ ऑल इंडीया ट्रेडर्स या व्यापारी महासंघाने बंदची हाक देण्याचा निर्णय घेतला आहे.
बंद यशस्वितेसाठी या संघटनेचे पदाधिकारी देशातील सर्व राज्यांचा दौरा करत आहेत. विविध व्यापारी संघटनांच्या भेटीगाठी घेत असल्याचे कॅटचे अध्यक्ष प्रविण खंडेलवाल यांनी म्हटले आहे. ऑनलाईन व्यावसायीकांना देखील या बंदमधे सामील करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे खंडेलवाल यांचे म्हणणे आहे. जीएसटीमधील जाचक तरतुदीबाबत केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा बंद यशस्वी होणार असल्याचा दावा केला जात आहे.