पित्याने केली पुत्राची हत्या – पित्यास अटक

On: February 13, 2021 12:09 PM
crimeduniya

जळगाव : मद्याच्या आहारी गेलेल्या मुलाची वडीलांनी हत्या केल्याची घटना जळगाव शहरातील बालाजी पेठ भागात घडली आहे. गुन्हा केल्यानंतर संशयीत सुभाष बंसीलाल वर्मा स्वत:हून शनीपेठ पोलिस स्टेशनला हजर झाला आहे.

शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील बालाजी पेठ भागातील रहिवासी असलेले सुभाष वर्मा यांना सौरभ नावाचा मुलगा असून त्याला मद्याचे व्यसन होते. त्याच्या व्यसनाला त्याचे वडील सुभाष वर्मा वैतागले होते. सौरभ हा दररोज दारु पिवून घरी आल्यावर घरात आई वडील व दोघा भावांना शिवीगाळ करत त्रास देत असे.
12 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता तो नेहमीप्रमाणे दारु पिवून घरी आला. त्यावेळी सौरभ व सुभाष या पिता पुत्रात शाब्दिक बाचाबाची झाली. या शाब्दीक बाचाबाचीनंतर दोघांमधील वाद वाढत गेला. अखेर संतापाच्या भरात सुभाष वर्मा यांनी सौरभच्या हातातील चाकू आपल्या ताब्यात घेतला. दरम्यान अंगावर धावून आलेल्या सौरभच्या पोटात चाकू घुसल्याने त्याच्या मृत्यू झाला.

जखमी सौरभ यास रुग्णालयात दाखल केले असता तपासणीअंती त्याला वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी मयत घोषित केले. घटनेनंतर सुभाष बंसीलाल वर्मा शनीपेठ पोलिस स्टेशनला हजर झाले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment