गच्चीवर बसण्याच्या वादातून हाणामारीत विठ्ठल सोनवणे यांचा मृत्यू

On: February 13, 2021 10:36 PM

जळगाव : घराच्या गच्चीवर नेहमी नेहमी का बसतात या कारणावरुन सतत होणा-या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. या हाणामारीत रामेश्वर कॉलनीतील रहिवासी विठ्ठल सोनवणे गच्चीवरुन खाली पडल्याने त्यांच्या मृत्यू ओढवला. या घटनेतून परिसरात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एमआयडीसी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव आटोक्यात आला.

मृत्युमुखी पडलेले विठ्ठल दौलत सोनवणे हे जळगाव जिल्हा परिट धोबी समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मेहरुण विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहेत. त्यांच्यावर उद्या वैकुंठधामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या वादाप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अल्ताफ पिरजादे व डॉ. सैय्यद फारुख पिरजादे (दोघे राहणार दत्तनगर मेहरुण) यांच्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment