नांदेड : नांदेड आगाराची शिवशाही बस शनिवारी हैदराबाद येथे जाण्यासाठी रवाना झाली होती. त्या बसला आज भल्या पहाटे तेलंगणा राज्यातील कामारेड्डी येथे चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने भिषण अपघात झाला. या भिषण अपघातात 17 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्यावरुन खाली दोन ते तिन वेळा उलटली. नांदेड आगारातून सुटलेल्या बसमधे 36 प्रवासी बसले होते. बसच्या चालक, वाहकासह सर्व प्रवासी कामारेड्डी येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत.