गळफास घेत तरुणाची आत्महत्या

On: February 16, 2021 8:00 PM

जळगाव : घरी कुणी नसतांना घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी आठ वाजता जगवानी नगरात उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे.

हर्षीत नितीन गायकवाड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याचे आईवडील लग्नानिमीत्त बाहेरगावी गेले होते. घरी एकटा असतांना त्याने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली. आज सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर त्याचे काका मनोज गायकवाड यांनी त्याला सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉ. प्रविण पाटील यांनी दिलेल्या खबरीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. हर्षित गायकवाड याने आत्महत्या का केली याचा खुलासा होवू शकला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment