
लखनऊ: उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरात गुंडांनी पोलीस पथकावर केलेल्या गोळीबारात डीएसपी देवेंद्र मिश्रा आणि स्टेशन प्रभारींसह 8 पोलीस शहीद झाले आहेत. विकास दुबे या हिस्ट्रिसीटर गुंडाविरोधात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल असून पोलीस पथक त्याच्या शोधार्थ रवाना झाले होते. दरम्यान दुबेच्या गुंडांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला.
या हल्ल्यात पोलिस अधिक्षकांसह 8 पोलीस शहीद झाले आहेत. या घटनेचे वृत्त समजताच एसएसपी आणि आयजी यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.
विकास दुबे यास पकडण्यासाठी गेलेल्या पथकात एक सीओ, एक एसओ, 2 एसआय आणि 4 जवान ठार झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर तिव्र शोक व्यक्त केला आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी डीजीपी एचसी अवस्थी यांना दिले आहेत.
कानपूरमधील गुंडांच्या हल्ल्यात पोलीस शहीद झाल्यानंतर यूपीचे डीजीपी एचसी अवस्थी म्हणाले, ‘जखमी झालेल्यांना शक्य तेवढेविकास दुबे या हिस्ट्रीशीटरला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकाला या गोळीबाराची कल्पना आली नव्हती. दरम्यान राज्याच्या सर्व सिमा सिल करण्यात आल्या आहेत.
