पोलिसांच्या गणवेशात दरोडे टाकणा-या दरोडेखोरांचे कोठडीतून पलायन

पुणे : सध्या जळगाव, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात चोरी आणि दरोड्याच्या घटनांनी उच्छाद मांडला आहे. जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरी व घरफोडीच्या काही घटना घडत आहेत. अहमदनगर पोलिस दलाच्या बिनतारी यंत्रणेचा लाखो रुपयांचा मुद्देमाल देखील चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना सोमवारी घडली.

पुणे जिल्ह्यातील भोर पोलीस स्टेशनच्या पोलिस कोठडीतून दोघा दरोडेखोरांनी आज पहाटे पलायन केले आहे. पोलिस कोठडीच्या खिडकीतून दोघा दरोडेखोरांनी पलायन केल्याचे उघडकीस आले. पोलिसांच्या वेशात दरोडे टाकणारे चंद्रकांत लोखंडे आणि प्रविण राऊत या दोघा दरोडेखोरांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. कापूरहोळ येथील ज्वेलर्सवर दरोडा टाकल्याच्या घटनेप्रकरणी दोघे अटकेत होते. या दरोड्याच्य्या घटनेत या दरोडेखोरांनी अठरा लाख रुपयांचा एवज लंपास केला होता. पोलिसांच्या वेशात हे दोघे दरोडे टाकत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here