धुळे : सेवानिवृत्त होणा-या शिपायाचा सेवानिवृत्ती प्रस्ताव धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्याकामी आठ हजारापैकी तिन हजार रुपयांचा पहिला हफ्ता लाचेच्या रुपात स्विकारतांना धुळे एसीबीच्या सापळ्यात मुख्याध्यापक अडकल्याची घटना आज घडली. न्यु इंग्लीश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाब नथु पिंजारी असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे.
धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या अख्त्यारीत पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलिस निरीक्षक मनजितसिंग चव्हाण, संदीप सरग, राजन कदम, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.