जळगाव : अवघ्या तेरा वर्षाच्या विद्यार्थ्याने आज दुपारी एक वाजता घरात दोरीने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवण्याची घटना जळगाव शहरात घडली. या विद्यार्थ्याने आत्महत्या का केली याचा उलगडा होवू शकला नाही.
जळगाव शहरातील ब्रुक बॉंड कॉलनीत राहणारे कैलास व रत्ना भोई यांचा मुलगा भूषण भोई (13) असे आत्महत्या करणा-या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे आईवडील चहा नास्त्याची गाडी लावून चरितार्थ चालवतात. घरात कुणीही नसल्याची संधी साधून भुषण याने आत्महत्या केली. जिल्हा पेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.