पुणे : गोडावूनमधे ठेवलेल्या घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस दुस-या रिकाम्या गॅसमधे भरुन विक्री करणारी 22 कर्मचा-यांची टोळी पिंप्री चिंचवड पोलिसांनी पकडली आहे. पोलिसांनी पकडलेले सर्व कर्मचारी सांगवी येथील भैरवनाथ गॅस एजन्सीमधे कामाला होते. 14 टेम्पोतील 312 भरलेले व रिकामे गॅस सिलेंडर हस्तगत करण्यात आले आहेत.
मुख्य गोडावूनमधील भरलेले गॅस सिलेंडर दुस-या गोडावूनमधे नेल्यानंतर त्या ठिकाणी कनेक्टरच्या मदतीने साधारण दिड ते दोन किलो गॅसची चोरी प्रत्येक सिलेंडरमधून केली जात होती. हा चोरीचा गॅस अन्य रिकाम्या गॅसमधे भरुन ते सिलेंडर पुर्ण केले जात होते. अशा प्रकारे चोरीच्या गॅसने भरलेले सिलेंडर ग्राहकांना कमी अधिक किमतीत विक्री केले जात होते.