पुणे : खून प्रकरणातून निर्दोष सुटल्यानंतर कुविख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याची मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे वरुन भव्यदिव्य मिरवणूक त्याच्या समर्थकांनी काढली होती. या मिरवणूकीसाठी शेकडो चारचाकी वाहनांचा वापर करण्यात आला होता.
बेकायदा गर्दी जमा करुन मिरवणूक काढल्याप्रकरणी गजानन मारणे याला जामीन मिळाला होता. त्यानंतर गजाननसह त्याच्या साथीदारांवर बेकायदा जमाव तयार करणे, सरकारी कामात अडथळा आणण्यासह आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अटकेच्या धाकाने गजानन मारणे फरार झाला असून पोलिसांनी तसे जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्याचा शोध सुरु आहे.