औरंगाबाद : औरंगाबाद येथील बेगमपुरा पोलीस स्टेशनमधे इतर अधिकारी व कर्मचा-यांप्रमाणे कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर आठ दिवसांनी एका कर्मचा-याचा मृत्यू झाला आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अनेक कर्मचारी आपापल्या कामावर रुजू झाले होते.
मात्र तिन दिवसांनी भास्कर शंकर मेटे (52) या पोलिस कर्मचा-यास एकाएकी श्वसनाचा त्रास सुरु झाला. त्यामुळे भास्कर मेटे यांना जळगाव रस्त्यावरील एम्स हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले. दरम्यान शुक्रवारी 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे. बेगमपुरा पोलिस स्टेशनला भास्कर मेटे हे हवालदार होते. हवालदार मेटे यांच्या पश्चात पत्नी, वैद्यकीय शिक्षण घेणारी मुलगी व बारावीत शिक्षण घेणारा मुलगा असा परिवार आहे.