जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली फाट्यानजीक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजता सोळा लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. या कारवाईत गुटखा वाहून नेणारी जीपसह बुलढाणा जिल्ह्यातील दोघांना अटक केली आहे. गोविंदा विश्वनाथ राऊत व गोविंदा सुभाष आखरे (रा. टुनकी तालुका संग्रामपुर जिल्हा बुलढाणा) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर – बुरहानपुर रस्त्यावर सदर कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री अंतुर्ली फाट्याजवळून जाणारी जीप (एमएच 28 बीबी 757) तपासली असता त्यात 21 लाख 22 हजार 720 रुपयांचा विमल गुटखा व सुगंधीत गुटखा आढळून आला.
पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहरे, सुमित दामोदरे, जितेंद्र पाटील, प्रीतम पाटील, दीपक पाटील, दीपक चौधरी, दीपक शिंदे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील दोघांना न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.