क्वारंटाईन सेंटरमधे सेक्स रॅकेट,अनेकांना झाली कोरोनाची लागण

On: July 3, 2020 2:45 PM

मेलबर्न : कोरोना संशयित व पॉझीटीव्ह रुग्णांसाठी असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याच्या माहितीने ऑस्ट्रेलीयाच्या मेलबर्न शहरात खळबळ माजली आहे. या घटनेमुळे अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे.

सद्यस्थितीत अनेक देश कोरोना या विषाणूसोबत मुकाबला करत आहेत. कोरोनामुळे विश्वातील परिस्थिती गंभीर झालेली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे ऑस्ट्रेलियातील विविध इमारती, हॉटेल्स अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्ण व संशयीतांसाठी सुरु असलेल्या क्वारंटाईन सेंटरमधे सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती उघड झाली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रशासनाने याप्रकरणी गांभिर्याने दखल घेतली असून चौकशी सुरु आहे.

कोरोनामुळे ऑस्ट्रेलियामधील नागरिक आणि कायमस्वरुपी रहिवाशांना देशात प्रवेश करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात आलेल्या व्यक्तीला 14 दिवस क्वारंटाईन राहण्याचा नियम सुरु आहे. यासाठी अनेक हॉटेल्समध्ये क्वारंटाईन सेंटर सुरु करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment