जळगाव : तीनशे रुपयांची लाच घेताना पारोळा पोलीस स्टेशनच्या सहायक फौजदारास नाशिक एसीबी पथकाने ताब्यात घेतले असल्याचे वृत्त समोर आले आहे.जगदीश विनायक पवार असे त्या लाचखोर सहायक फौजदाराचे नाव आहे. पारोळा तेअमळनेर दरम्यान प्रवासी वाहतूक करणाऱ्यावाहनधारकावरील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी सहायक फौजदारजगदीश विनायक पवार यांनी तीनशे रुपयांचीलाच मागितल्याप्रकरणी नाशिक एसीबीपथकाने ही कारवाई केली आहे.