उस्मानाबाद : चौदा दिवसांपुर्वी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेले उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाला आला आहे. त्यामुळे कोरोना लसीबाबत जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी दिवेगावकर यांची प्रकृती स्थिर असून ते घरुन कामकाज करणार असल्याचे म्हटले जात आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मी घेतलेली लस सुरक्षीत असल्याचे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी म्हटले होते. तुम्ही देखील घ्या असा प्रचार त्यांनी केला होता. कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर काही दिवसांनी रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होत असल्याचे सांगत तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे.