जळगाव : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकामी उपाययोजनेचा अवलंब न करता पन्नासपेक्षा अधिक जणांच्या उपस्थितीत लग्न लावल्यामुळे जळगाव शहरातील विविध मंगल कार्यालयांवर आज कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. जळगाव शहराच्या एमआयडीसी परिसरातील बालाणी लॉन, मुक्तांगण हॉल तसेच श्रीकृष्ण लॉन या तिन मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापकांसह लग्नाच्या आयोजकांवर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाकडून रितसर कारवाई करण्यात आली आहे.
गुंजन मंगल कार्यालय, साईलीला, पद्मावती मंगल कार्यालय, जैस्वाल, मैत्रेयाज, प्रेसीडेंट, अजिंठा, इकबाल हॉल आदी ठिकाणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भेटी दिल्या आहेत.या कारवाईत पो.नि.विठ्ठल ससे, स.पो.नि.अमोल मोरे, पोलिस उप निरिक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. तुकाराम निंबाळकर, पोलिस नाईक ललित गवळे, पोलिस नाईक इमरान सैय्यद, पो.कॉ. गोविंदा पाटील व तुषार गिरासे यांनी सहभाग घेतला.