लसीकरणानंतर दुसऱ्याच दिवशी पोलीस अधिका-यास कोरोना

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पोलिस अधिका-याने कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर दुस-यास दिवशी त्यास कोरोनाची लागण झाली आहे. तत्पुर्वी पोलिस आयुक्त कृष्णप्रकास व अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी लस घेतली. त्यानंतर इतर पोलिस अधिकारी वर्गाने लस घेतली. 15 फेब्रुवारी लस घेतल्यानंतर दुस-याच दिवशी लस घेतलेल्या पोलिस अधिका-याचा अहवाला कोरोना पॉझीटीव्ह आला आहे. सध्या रुग्णालयात सदर अधिकारी वैद्यकीय उपचार घेत आहे.

आतापर्यंत तिघा पोलिस कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. पुणे पोलिस दलात अकरा कोरोना पॉझीटीव्ह असून त्यापैकी पाच जण वैद्यकीय उपचार घेत आहेत व सहा जण घरच्या घरीच उपचार घेत आहेत. पुणे पोलिस दलात आतापावेतो 564 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here