भवरलालजी जैन यांचे भव्य पोट्रेट – वर्ल्ड रेकॉर्डची शक्यता

जळगाव : जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांचा गुरुवार 25 फेब्रुवारी रोजी पाचवा स्मृतीदिन आहे. या स्मृतीदिनाचे औचित्य साधत जैन मोठे भाऊ यांचे जैन पाईप्सच्या सहाय्याने 150 फूट लांब आणि 120 फूट रुंद असे 18 हजार चौरस फुट आकारातील भव्यदिव्य मोझ्याक आर्ट मधील पोट्रेट जैन व्हॅली परिसरातील ‘भाऊंची सृष्टी’ या ठिकाणी साकारले जात आहे. या कलाकृतीची नोंद विश्वस्तरावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जैन इरिगेशनचे कुशल सहकारी प्रदीप भोसले यांच्या कल्पकतेतून भवरलालजी जैन यांच्या पोट्रेटची निर्मिती अवघ्या सात दिवसात झाली आहे. अत्यंत कल्पकतेने जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने अवघ्या सात दिवसात साकारले आहे. ही कलाकृती कायमस्वरुपी स्थापित करण्यात आली असून जागतिक विक्रम प्राप्त होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या कलाकृतीला भाऊंच्या सृष्टीतील नयनरम्य अशा भाऊंच्या वाटिकेतून आपण बघू शकतो. मोठ्या भाऊंच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार 25 फेब्रुवारी रोजी या कलाकृतीचे लोकार्पण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here