100 तोळे सोने, 10 लाखांची रोकड – औरंगाबादला जबरी दरोडा

On: February 24, 2021 2:23 PM

औरंगाबाद : औरंगाबाद येथील प्रताप नगर भागात डॉ. सुषमा सोनी यांच्या बंद घराला लक्ष्य करत चोरट्यांनी तब्बल 100 तोळे वजनाचे सोने आणि 10 लाख रुपयांची रोकड असा जवळपास 70 लाख रुपयांचा मुद्देमाल गायब केला आहे. डॉ. सुषमा सोनी या आपल्या कुटूंबासह पर राज्यात देवदर्शनासाठी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी आपला हात साफ करुन घेतला आहे. पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे आदींसह अधिका-यांनी घटनास्थळी दाखल होत पुढील तपासाला सुरुवात केली आहे. आज सकाळी या घटनेची वाच्यता झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment