अडीच लाखांचे २४ मोबाईल चोरणारे पुण्याच्या दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात

On: July 3, 2020 9:20 PM

पुणे: पाटे संस्कृती मैदानावर थांबलेल्या दोघा संशयित तरुणांची पोलिसांनी चौकशी केली असता ते अट्टल मोबाईल चोर असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी लॉकडाऊन कालावधीत अडीच लाख रुपयांचे २४ मोबाईल चोरल्याची बाब समोर आली आहे.  

अमर वैजनाथ समुखराव (२०) रा़. आंबेगाव पठार, मुळ पांढरगाव, ता़ गंगाखेड, जि. परभणी व प्रविण ऊर्फ अनिल नामदेव विटकर (२३) रा़ जांभुळवाडी रोड, कात्रज अशी या चोरट्यांची नावे आहेत. दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस शिपाई सागर सुतकर यांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून या दोघांना ताब्यात घेण्यात आले होते.

त्यांच्या ताब्यातील दुचाकीची त्यांच्याकडे कागदपत्रे देखील नव्हती. त्यांच्याकडील मोबाईल त्यांनी तावरे कॉलनीतून चोरल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. अधिक चौकशी अंती त्यांनी गेल्या ३ महिन्याच्या कालावधीत  तब्बल २४ मोबाईल चोरल्याचे उघड झाले. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार व त्यांच्या पथकाने सदर कामगिरी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment