भ्रष्टाचार वरिष्ठांना विचारुन केला जात नाही – पोलिस महासंचालक

On: February 26, 2021 10:49 AM

नागपुर : भ्रष्टाचाराचे आपण समर्थन करत नाही. भ्रष्टाचार करणारा अधिकारी अथवा कर्मचारी कुण्या वरिष्ठाला विचारुन करत नसल्याचे वक्तव्य पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनी नागपुरात एका पत्रकार परिषदेदरम्यान केले आहे. पोलिस व महसुल खात्यातील कर्मचारी वर्गाचे संख्याबळ इतर खात्याच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचा आकडा इतर खात्याच्या तुलनेत कमी आहे.

नागपुर येथील पोलिस जिमखान्यात आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस महासंचालक हेमंत नगराळे बोलत होते. कोरोनामुळे मरण पावलेल्या 339 पोलिसांच्या वारसांना पोलिस दलात सामावून घेतले जाणार असल्याचे त्यांनी पुढे बोलतांना सांगितले. पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तपास योग्य रितीने सुरु असल्याचे देखील नगराळे यांनी यावेळी म्हटले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment