सातारा: वाळू तस्करीस मदत करण्यासाठी लाच घेतांना दोन पत्रकारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रात्री नऊ वाजता रंगेहाथ पकडले आहे. सदर कारवाई म्हसवड येथे झाली. या कारवाईमुळे पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.अॅन्टी करप्शनने ताब्यात घेतलेल्या दोघापैकी पुण्यातील एका दैनिकाच्या पत्रकाराचा समावेश आहे.
अमोल अदिनाथ खाडे (31) आणि जयराम विठ्ठल शिंदे (32) अशी लाच घेणा-यांची नावे आहेत. वाळु तस्करीस मदत करण्यासाठी दोघांनी तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचेचा पहिला हप्ता आज त्यांनी 25 हजार रूपये स्विकारला.
दरम्यान, अॅन्टी करप्शन पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, उप अधीक्षक सुषमा चव्हाण, पोलिस निरीक्षक गुरूदत्त मोरे, प्रशांत चोगुले, पोलिस हवालदार संजय सपकाळ, संजय कलगुटी आणि पोलिस नाईक मकानदार यांच्या पथकाने सापळा रचला होता.दोघेही पत्रकार असून त्यातील एक पुण्यातील दैनिकाचा पत्रकार आहे तर दुसरा पत्रकार सातार्यातील आहे.