नवी दिल्ली: कॅनरा बँकेची 174.89 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पंजाब बासमती राईस लिमिटेड व संचालकांच्या विविध ठिकाणांवर सीबीआयने धाडी टाकल्या आहेत.
पंजाब बासमती कंपनी आणि त्यांच्या संचालकांवर कॅनरा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंजाबच्या अमृतसरमध्ये कंपनीचे कार्यालय आणि आरोपी संचालक कुलविंदरसिंह मखानी, जसमित कौर आणि मनजितसिंह मखानी यांच्या विविध ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या.
याबाबत सीबीआयचे प्रवक्ते आर.के. गौडा यांनी सांगितले अहे की, तक्रारीत केलेल्या आरोपानुसार आरोपींनी कॅनरा बँकेच्या नेतृत्वातील समूह आंध्रा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, आयडीबीआय बँक, युको बँक या सर्व बॅंकांची 350.84 कोटी रुपयात फसवणूक केली आहे. यात कॅनरा बँकेच्या 174.89 कोटी रुपयांचाही समावेश आहे.