दोन तुकड्यातील मयत तरुणाची ओळख पटेना!

On: February 28, 2021 9:26 PM

जळगाव : शहरातील आसोदा रेल्वेगेट नजीक एका तरुणाने धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत शनीवारी दुपारी आत्महत्या केली. या तरुणाच्या मृतदेहाचे दोन तुकड्यात विभाजन झाले असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मयत तरुणाच्या खिशात केवळ फोटो, पाकीट व रुमाल एवढाच एवज आढळून आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच शनीपेठ पोलिस स्टेशनचे पो.नि.विठ्ठल ससे व त्यांचे सहकारी प्रमोद पाटील, अमित बाविस्कर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचे दोन्ही तुकडे सामान्य रुग्णालयात आणले गेले. या प्रकरणी शनीपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment