पोलिस निरिक्षकांंच्या दालनातच चाकूहल्ला

On: March 1, 2021 3:42 PM

कराड : जुन्या वादाच्या कारणातून पोलिस स्टेशनला आलेले दोघे जण पोलिस निरिक्षकांच्या दालनात आपली कैफीयत मांडत असतांना एकाने दुस-यावर चाकू हल्ला केल्याची घटना कराड येथे घडली. सदर घटना आज साडेबारा वाजता कराड शहर पोलिस निरिक्षकांच्या दालनातच घडली. त्यामुळे पोलिस स्टेशनमधे काही काळ तणाव निर्माण झाला होता. चाकू हल्ला करणा-या हल्लेखोरास तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे. जखमीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

किशोर पांडुरंग शिखरे (30) रा. हजारमाची कराड असे जखमीचे व लखन भागवत माने असे हल्लेखोराचे नाव आहे. चाकूहल्ला करणारा लखन माने याचे जखमी झालेल्या किशोर शिखरे याच्य वडीलांशी जुना वाद आहे. या वादातून दोघे जण व. पो.नि. बी. आर. पाटील यांच्या समक्ष हजर झाले होते. दरम्यान अचानक हा चाकू हल्ला झाला. हल्लेखोर लखन माने याने किशोर शिखरे याच्यावर चाकूचे तिन वार केले आहेत. जखमीला रुग्णालयात रवाना करण्यात आले असून हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment