चोरीच्या दुचाकीसह चोरटा एलसीबीच्या ताब्यात

On: March 1, 2021 9:24 PM

जळगाव : चोरीच्या दुचाकीसह चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज ताब्यात घेत अटक केली आहे. शशीकांत ताराचंद बाविस्कर रा. चौगाव ता. चोपडा असे अटकेतील चोरट्याचे नाव असून त्याच्या ताब्यातील दुचाकीच्या चोरीबाबत धुळे तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासकामी त्याला धुळे तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या तपासकामी पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. रवींद्र गायकवाड, पो. हे.कॉ. अनिल देशमुख, पो.हे.कॉ. कमलाकर बागुल, पो.हे.कॉ. सुरज पाटील, पो.हे.कॉ. प्रदीप पाटील, चालक -पोलिस नाईल भरत पाटील, पो.कॉ.परेश महाजन यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment