पोलिस उप निरिक्षकास भोवले “लिव्ह इन रिलेशनशीप”

पुणे : विवाहीत असतांनादेखील तरुणीसोबत प्रेम आणि शरीरसंबंध निर्माण करुन तिला गर्भपात करण्यास भाग पाडणे पोलिस उपनिरिक्षकास भोवले आहे. असले वर्तन पोलिस खात्याची प्रतिमा दुषीत करणारी असल्याने सदर पोलिस उपनिरिक्षकास सेवेतून निलंबीत होण्याची वेळ आली आहे.

सध्या हडपसर येथे नेमणूकीस असलेल्या विवाहीत पोलिस उप निरीक्षकाचे गडचिरोली येथे नेमणूकीस असतांना ऑगस्ट 2019 पुर्वी एका तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमसंबंधातून त्या पोलिस उप निरीक्षकाने तिला हडपसर पुणे येथे आणून भाड्याचे घर घेवून दिले. या ठिकाणी दोघे जण डिसेंबर 2019 पासून लिव्ह इन रिलेशनशिप मधे राहू लागले. याठिकाणी दोघात शरीरसंबंध घडून आले. त्यानंतर मात्र नवलाईचे नऊ दिवस भरकन निघून गेले. दोघात कुरबुरी सुरु झाल्या. दोघांचे पटेनासे झाले. दरम्यान एक वेळा तरुणीचा गर्भपात करण्यात आला. लग्नास नकार मिळत गेल्यामुळे दोघातील वाद शमत नव्हता. अखेर तरुणीने भरोसा सेलमधे तक्रारी अर्ज दाखल केला. त्यानंतर दोघांचे समुपदेशन झाले. महिला दक्षता समितीसमक्ष तिने आपली तक्रार नसल्याचे लिखीत स्वरुपात दिले. मात्र हा प्रकार पोलिस दलाच्या प्रतिमेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे स्पष्ट करत अप्पर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी सदर पोलिस उप निरीक्षकास निलंबीत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here