जळगावच्या आशादीप वसतीगृह प्रकरणी होणार चौकशी – गृहमंत्री

On: March 3, 2021 1:39 PM

मुंबई : जळगाव येथील आशादीप महिला वसतीगृहात मुलींना विवस्त्र अवस्थेत नाचण्यास भाग पाडल्याप्रकरणी चार अधिका-यांची समिती नेमली जाणार असून त्यांच्या माध्यमातून चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

जळगाव स्थित गणेश कॉलनी भागातील शासकीय आशादीप महिला वसतीगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत. याप्रकरणी बराच गदारोळ माजल्यानंतर गृहमंत्र्यांनी चौकशी समिती नेमली जाणार असल्याची व त्यांचा अहवाला आल्यानंतर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment