पुणे : सध्या येरवडा कारागृहात असलेले रा.कॉ.चे विधानपरिषदेवरील आमदार अनिल भोसले यांना ईडी ताब्यात घेणार आहे. शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर आरोप आहेत. बँकेकडून झालेल्या कथित बेनामी कर्जवाटप प्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून 25 फेब्रुवारी रोजी अनिल भोसले यांना अटक करण्यात आली आहे.
सध्या येरवडा कारागृहात असलेल्या अनिल भोसले यांच्याविरुद्ध ईडीने गुन्हा दाखल केला असून या तपासकामी त्यांना लवकरच ईडी ताब्यात घेणार आहे. भोसले यांचा ताबा मिळवण्यासाठी संबंधीत न्यायालयातून आदेश काढण्यात आला आहे. ईडीच्य अधिकारी वर्गाचे एक पथक पुणे येथे रवाना झाले आहे. त्यामुळे लवकरच अनिल भोसले यांना अटक होईल व त्यांच्या अडचणी देखील वाढणार आहेत. अनिल भोसले यांच्यासह त्यांची नगरसेवीका पत्नी रश्मी भोसले यांच्यासह एकुण सोळा जणांविरुद्ध बॅंकेत 71 कोटी 78 लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी आरोप असून गुन्हा दाखल आहे.