जळगाव : रितसर अर्ज केल्यानंतर डिमांड नोट भरुन देखील तक्रारदाराच्या हॉटेलमधे विज संयोजन देण्यासाठी विज कंपनीच्या तंत्रज्ञासह कंत्राटी वायरमनने मागीतलेली व घेतलेली लाच त्यांना आज त्रासदायक ठरली. रविंद्र धनसिंग पाटील (सब स्टेशन विदगाव ता. जि. जळगाव) असे वरिष्ठ तंत्रज्ञाचे आणि प्रल्हाद उत्तम सपकाळे (विदगाव – जळगाव) असे कंत्राटी वायरमनचे नाव आहे.
तक्रारदाराचे अमोदा खुर्द ता. जि. जळगाव येथे स्वत:च्या शेतात हॉटेल आहे. या हॉटेलमधे विज संयोजन मिळण्याकामी तक्रारदाराने विज कंपनीकडे रितसर अर्ज केला होता तसेच डिमांड नोट देखील जमा केली होती. तरीदेखील तक्रारदारास सात हजाराची लाच दोघांनी मागीतली होती. या मागणी केलेल्या लाचेच्या रकमेपैकी सहा हजाराची लाच पंचांसमक्ष घेतांना दोघे जण एसीबीच्या जाळ्यात अडकले.
एसीबी जळगावचे डिवायएसपी गोपाल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. निलेश लोधी, पो.नि. संजोग बच्छाव, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ. सुनिल पाटील, पो.हे.कॉ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे, म. पो. हे. कॉ.शैला धनगर, पो. ना.मनोज जोशी, पो. ना.सुनिल शिरसाठ, पो. ना.जनार्धन चौधरी, पो. कॉ.प्रविण पाटील, पो. कॉ.नासिर देशमुख, पो. कॉ. ईश्वर धनगर, पो. कॉ. प्रदिप पोळ आदींनी कारवाईत सहभाग घेतला.