पान मसाला व तंबाखूचा साठा जप्त – एक अटकेत

On: March 7, 2021 8:58 PM

जळगाव : जळगाव सिंधी कॉलनी परिसरात आज एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने छापेमारी करत 9 हजार 900 रुपये किमतीचा पान मसाला व तंबाखूचा साठा जप्त केला असून बेकायदा साठा बाळगणा-यास अटक केली आहे. महेंद्र गोवर्धनदास होतुमलानी असे अटकेतील पान मसाला व तंबाखू विक्रेत्याचे नाव आहे. आरोग्यास अपायकारक असलेल्या पान मसाला व तंबाखूजन्य वस्तूंचा विक्री करण्याच्या उद्देशान साठा करणा-या महेंद्र होतुमलानी यास सिंधी कॉलनी येथील संत कंवरराम गल्ली, झुलेलाल स्वीट याठिकाणी हा छापा टाकत कारवाई केली.

सहायक फौजदार तुकाराम निंबाळकर यांनी याप्रकरणी रितसर फिर्याद दाखल केली. सदर कारवाई प्रशिक्षणार्थी पोलिस उप अधिक्षक नितीन गणपुरे यांचेसह पोलिस उप निरिक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पो.हे.कॉ. विजय नेरकर, जितेंद्र राजपुत यांचेसह मुख्यालयातील क्युआरटी पथकातील पो.कॉ. फारुख शेख, विजय अहिरे, अमोल करडईकर, प्रकाश कोकाटे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. आज दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईने सिंधी कॉलनी परिसरात खळबळ माजली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment