पोलीस कोठडीतील आरोपींना कोरोना

On: July 12, 2020 7:12 PM

उल्हासनगर: विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमधे दाखल गुन्हयातील पोलीस कोठडीत असलेल्या ५ पैकी तिघा आरोपींना कोरोनाची लागण झाली. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आरोपींच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना क्वारंटाईन होण्याचा प्रसंग या घटनेतून आला आहे.

उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिसांनी एका गुन्हयातील पाच आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी त्यांची कोरोना टेस्ट केली. त्यातील तिघांना कोरोनाची लागण झाली असल्याचे उघड झाले. त्यांना उपचारासाठी तात्काळ कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

आरोपींच्या संपर्कात आलेल्या काही कर्मचा-यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले. शहरातील उल्हासनगर, मध्यवर्ती, विठ्ठलवाडी व हिललाईन पोलिस स्टेशनच्या काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment