मोटार सायकलचोर अटकेत

On: March 8, 2021 5:39 PM

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अनिकेत कडूबा चौथे (21) रा. माळी गल्ली पहुर कसबे ता. जामनेर यास त्याच्या ताब्यातील मोटारसायकलसह पहुर येथून ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील चोरीच्या मोटारसायकलच्या चोरीचा गुन्हा बोदवड पोलिस स्टेशनला नोंद झालेला आहे. ताब्यातील आरोपी अनिकेत कडूबा चौथे यास पुढील तपासकामी बोदवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्यात अनिकेत चौथे याचा साथीदार शिवाजी रामदास चौधरी हा देखील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. सुनिल दामोदरे, विजय शामराव पाटील, सचिन महाजन व पंकज शिंदे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास बोदवड पोलिस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment