जनमत व श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानतर्फे महिला दिन उत्साहात

On: March 8, 2021 9:51 PM

जळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त जनमत प्रतिष्ठान व श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान तसेच अन्याय अत्याचार निर्मूलन समिती जळगाव यांच्या वतीने हरिविठ्ठल नगर भागातील भिलाटी वस्तीमध्ये महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सानिया तडवी या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. भिलाटी वस्तीतील महिलांना साड्या वाटपासह लहान मुलांना फराळ आणि मास्कचे वितरण करण्यात आले.

अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या सुचीत्राताई महाजन यांना ट्रॉफी देऊन त्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक भाऊ दाभाडे, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या उपाध्यक्ष मनीषा पाटील, सहसचिव हर्षाली पाटील, रीना तडवी, कोटा क्लासचे संचालक संजय सिंग ,रोहन महाजन आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment