लाचेची मागणी पोलिस नाईकास भोवली

ACB-Crimeduniya

जळगाव : धरणगाव पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या भा.द.वि. 420 च्या गुन्ह्याचे अनुकुल दोषारोपपत्र न्यायालयात रवाना करण्याकामी 19 हजार रुपयांच्या लाचेची मागणी पोलिस नाईकाला भोवली आहे. धरणगाव येथे कार्यरत असणा-या विलास बुधा नाईक असे लाच मागणा-या पोलिस नाईक कर्मचा-याचे नाव आहे.

धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील तक्रारदाराविरुद्ध धरणगाव पोलिस स्टेशनला भा.द.वि. 420 अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र अनुकुल पद्धतीने न्यायालयात पाठवण्याकामी पोलिस नाईक विलास बुधा नाईक यांनी तक्रारदाराकडे 19 हजार रुपयांची मागणी केली होती. दरम्यान आपण एसीबीच्या जाळ्यात अडकत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस नाईक विलास नाईक यांनी तक्रारदाराकडील एसीबीचे डीव्हाईस हिसकावून घेतले. याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला गु.र.नं. 119/21 नुसार भ्र.प्र.अ.-कलम-7 सह कलम-392, 201, 186 अन्वये आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे डिवायएसपी गोपाल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. निलेश लोधी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ. ईश्वर धनगर यांच्या पथकाने या सापळ्यात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here