नागपुरात बेरोजगार अभियंत्याने घेतला गळफास

On: July 4, 2020 8:09 PM

नागपूर: बेरोजगारीला कंटाळून तरुण अभियंत्याने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना नागपुरात घडली. सिद्धांत संजय कडू (२२) असे या तरुण अभियंत्याचे नाव आहे. तो नरेंद्र नगरातील अर्चित पॅलेस येथील जय दुर्गा अपार्टमेंटमध्ये रहात होता.

सधन कुटूंबातील सिद्धांतने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याचे वडील निवृत्त शासकीय नोकरदार व  बहीण डॉक्टर आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील त्याला रोजगार मिळाला नाही. त्यामुळे सिद्धांत निराश झाला होता. त्याची मानसिकता बिघडली होती. त्याच्यावर रामदासपेठ भागातील एका मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार देखील सुरू होते.

सिद्धांतने गुरुवारी मध्यरात्री स्वत:च्या रूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. मृत्यूपुर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात आई-वडिलांची त्याने क्षमा मागितली आहे.   शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास त्याचे आई-वडील झोपेतून उठले.  त्यावेळी सिद्धांतने गळफास घेतल्याचे उघड झाले. या प्रकरणी बेलतरोडी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment