बांधकामाच्या सेंट्रींग प्लेट चोरणा-यास अटक

On: March 10, 2021 7:07 PM

जळगाव : बांधकामाच्या स्लॅबची बांधणी करतांना लागणा-या लोखंडी प्लेटची चोरी करणा-यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला बांधकाम सेंट्रींग ठेकेदार वैभव कैलास साळूंखे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिपक शालीग्राम तिवणे ( रा. जुन्या रेशन दुकानाजवळ हरीविठ्ठल नगर जळगाव ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

वैभव साळुंखे हे सेंट्रींग ठेकेदार असून सोपानदेव नगर विश्वकर्मा मंदीराजवळ त्यांचे काम सुरु आहे. या बांधकामाच्या स्लॅब बांधणीकामी त्यांनी 3 बाय 2 फुट आकाराच्या 142 नग लोखंडी प्लेट भाड्याने आणल्या होत्या. 18 व 19 फेब्रुवारी च्या दरम्यान सोपानदेव नगर येथे सुरु असलेल्या बांधकामावरुन त्यांनी भाड्याने आणलेल्या 142 लोखंडी प्लेट कुणीतरी लबाडीच्या इराद्याने चोरुन नेल्याचे निष्पन्न झाले होते.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान दिपक शालीग्राम तिवणे यास अटक करण्यात आली असून त्याने चोरलेल्या प्लेट हस्तगत करण्यात आल्या आहेत. या गुन्ह्याच्या तपासकामी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, सुनील सोनार व सचिन पाटील यांनी सहभाग घेत आरोपीस अटक केली आहे. त्यास न्या. सुवर्णा कुळकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. सरकारतर्फे अ‍ॅड.प्रिया मेढे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment