रावेर पत्रकार संघातर्फे मोफत नेत्र तपासणी उत्साहात

जळगाव : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुका यांच्या वतीने मोफत नेत्र शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात रावेर तालुक्यातील खिरवड, दोधा, नेहता, पुनखेडा, पातोंडी, रावेर, शिंदखेडा, ऐनपूर, मोरगाव, अजनाड, खानापूर, रसलपूर, विवरे,भाटखेडा, उटखेडा, कुंभारखेडा, सावखेडा, वडगाव, निंभोरा यासह विविध गावातील गरजू रुग्णांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

जळगाव येथील भवरलाल अ‍ॅंड कांताई नेत्रालयाच्या सौजन्याने आयोजीत करण्यात आलेल्या या शिबीरात एकुण बारा रुग्णांची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हे शिबीर झाले. याप्रसंगी खान्देश माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष मुरलीधर उर्फ पिंटू महाजन, फुले – शाहू – आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, युवासेनेचे सचिव जयेश पाटील, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुकाध्यक्ष विलास ताठे, शहराध्यक्ष विनोद कोळी, रितेश दुबे, आबा ड्रायव्हर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. या मान्यवर मंडळींनी सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.

कांताई नेत्रालय तर्फे दर महिन्याच्या दहा तारखेला पुणे अंधजन मंडळ व भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशन व्दारा पुरस्कृत कांताई नेत्रालय यांचे तर्फे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेतले जाते. सदर शिबीर डॉ.वैभव चौधरी व कांताई नेत्रालयाचे शिबिराचे कॅम्प मॅनेजर युवराज देसर्डा यांच्या प्रमुख भूमिकेतून घेण्यात येते.
सदर शिबीर यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुकाध्यक्ष विलास ताठे, उपाध्यक्ष संतोष नवले,योगेश सैतवाल कार्याध्यक्ष, शहराध्यक्ष विनोद कोळी,शेख शरीफ ,शेख अजीज, सद्दाम पिंजारी, गणेश पाटील, अनिल मानकरी यांच्यासह सर्व रावेर तालुका पत्रकार बंधूनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here