जळगावच्या तरुणासह चौघांना शस्त्रांसह पुण्यात अटक

On: March 11, 2021 4:31 PM

जळगाव : जळगाव येथुन पुणे येथे शस्त्रांची विक्री करण्याच्या उद्देशान आलेल्या चौघांना पुणे येथील खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. या चौघांच्या ताब्यातून आठ देशी बनावटीचे पिस्टल तसेच 15 जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले आहेत. हस्तगत करण्यात आलेला शस्त्रसाठा जवळपास 4 लाख 30 हजार रुपयांचा असल्याचे समजते.

भूषण महेश मराठे (23), चोपडा, जळगाव असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. राहुल चंद्रकांत पवार (23), नसरापूर, भोर, तौफिक गुलाब शेख (25), शिवाजीनगर तसेच राम गोरोबा जाधव (25), दांडेकर पूल, पुणे अशी अटकेतील तरुणांची नावे आहेत. जळगाव येथून एक तरुण पिस्तूल विक्रीसाठी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आलेला असल्याची गुप्त माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस अमंलदार सचिन अहिवळे यांना समजली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून भूषण मराठे यास शिताफीने ताब्यात घेत त्याच्या कब्जातून तिन पिस्टल व 6 जिंवत काडतुसे हस्तगत करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment