गुप्तचर विभागाचा तोतया पोलिस अधिकारी अटकेत

पिंपरी : नाकाबंदी सुरु असतांना मास्कविना दुचाकीवर फिरणा-या व आपण गुप्तचर विभागात अधिकारी असल्याची बतावणी करणा-या तोतयास अटक करण्यात आली आहे. नाकाबंदी दरम्यान उपस्थित असलेल्या अधिका-यांना त्याच्या बोलण्याची शंका आल्यामुळे व त्याची पडताळणी केली असता त्याचे बिंग फुटले. त्याला निगडी पोलिसांनी अटक केली आहे.

प्रतिक सुनिल भावसार(25) विशालनगर वाकड असे अटकेतील व स्वत:ला गुप्तचर विभागाचा अधिकारी म्हणवणा-या तोतयाचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक गणेश जवादवाड यांनी त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. रात्रीच्या वेळी नाकाबंदी सुरु असतांन प्रतिक हा त्याच्या ताब्यातील एमएच 12 एमएस 3035 या क्रमांकाच्या मोटारसायकलने आकुर्डी स्टेशनला आला होता. त्यावेळी निगडी पोलिस नाकाबंदी अभियान राबवत होते. विनामास्क आलेल्या प्रतिकला सोपान बोधवड या पोलिस कर्मचा-याने अडवले. त्याला पाचशे रुपयांच्या दंडाची आकारणी करण्यास सांगितले असता त्याने आपण गुप्तचर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी सुरु केली.

ओळखपत्राची मागणी केली असता आपल्याला ओळखपत्र दाखवण्यास मनाई असल्याचे त्याने म्हटले. त्यावर तुमच्या वरिष्ठांसोबत फोनवर बोलणे करुन द्या असे म्हटले असता त्याने म्हटले की मी सुटीवर असून वरिष्ठांना फोन केल्यास ते माझ्यावर कारवाई करतील. त्याच्या अशा बोलण्यामुळे प्रतिक हा तोतया असल्याची पोलिसांची शंका बळावली. पोलिस कर्मचारी बोधवड यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक गणेश जवादवाड यांच्या कानावर हा प्रकार घातला. व.पो.नि. जवादवाड यांनी तातडीने स.पो.नि. लक्ष्मण सोनवणे व पोलिस उप निरिक्षक रावसाहेब बांबळे यांना खात्री करण्याकामी घटनास्थळी रवाना केले. सखोल चौकशीत प्रतिक उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्याजवळ गुप्तचर विभागाचे नकली ओळखपत्र असल्याचे उघड झाले. त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here