दिड लाख रुपयांची लाच – कार्यालय अधिक्षक एसीबीच्या सापळ्यात

ACB-Crimeduniya

जळगाव : दोन लाख रुपयांच्या लाचेपैकी तडजोडीअंती दिड लाख रुपयांची लाच घेतांना एरंडोल नगर परिषदेतील कार्यालय अधिक्षक (कर निर्धारण व प्रशासकीय सेवक) संजय दगडू ढमाळ एसीबीच्या सापळ्यात आज अडकले. धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला आहे. यातील तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे नगरपालिकेच्या व्यापारी संकुलात गाळा आहे. या व्यापारी संकुलातील काही गाळ्यांची मुदत संपलेली आहे. मुदत संपलेल्या गाळ्यांना सिल करण्यात आले आहे.

तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे असलेल्या गाळ्यांना नोटीस न देण्यासाठी तडजोडीअंती कार्यालय अधिक्षक ढमाळ यांनी तडजोडीअंती दोन लाख रुपयांच्या लाचेपैकी दिड लाख रुपयांची मागणी पंचासमक्ष केली होती. सदर लाचेची मागणी स्विकारतांना कार्यालय अधिक्षक संजय ढमाळ रंगेहाथ पकडले गेले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. धुळे एसीबीचे डिवायएसपी सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक मनजीतसिंग चव्हाण, सुधीर सोनवणे, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, राजन कदम, सुधीर मोरे आदींनी कारवाईत सहभाग घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here