जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीच्या सतरा मोटारसायकलीसह तिघा चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. चोरट्यांच्या टोळीतील सहापैकी तिन जण अटकेत असून उर्वरीत तिघे फरार आहेत. फरार तिघांचा शोध सुरु आहे. अतुल नाना पाटील (पथराळ ता.भडगाव), भिमराव रामअवतार प्रसाद (देवळा ता.देवळा जि.नाशिक), अमजद आरिफ मन्सुरी (देवळा ता.देवळा जि.नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा चोरट्यांची नावे आहेत.
मोटार सायकल चोरीच्या तपासात सुरुवातीला अतुल नाना पाटील यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुरुवातीला चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचे साथीदार योगेश शिवाजी दाभाडे, जगदिश बाळू शेळके, निलेश ऊर्फ विक्की पुंडलीक पाटील (तिघे रा.पथराळा ता.भडगाव), भिमराव रामअवतार प्रसाद, अमजद आरिफ मन्सुरी (दोन्ही रा.देवळा ता.देवळा जि.नाशिक) यांची नावे उघड झाली. यातील योगेश शिवाजी दाभाडे, जगदीश बाळू शेळके आणि निलेश उर्फ विक्की पुंडलीक पाटील हे फरार आहेत.
ताब्यातील चोरट्यांनी दिलेल्या माहीतीनुसार जळगाव रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील 1, चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील 5, चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील 1, पाचोरा पोलिस स्टेशन हद्दीतील 2, पारोळा पोलिस स्टेशन हद्दीतील 2, मालेगाव छावणी पोलिस स्टेशन हद्दीतील 3, भोसरी पोलिस स्टेशन हद्दीतील 1 अशा एकुण 15 मोटारसायकल चोरीचा तपास लागला आहे. ताब्यातील उर्वरीत दोन मोटारसायकलचा तपास बाकी आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. रविंद्र गिरासे, सहायक फौजदार विजय देवराम पाटील, पो.हे.कॉ. नरेंद्र वारुळे, पो.ना. संदिप सावळे, पो. हे.कॉ. प्रदिप वसंतराव पाटील, पो. हे. कॉ. जयंत भानुदास चौधरी, पो. हे. कॉ. गोरख बागुल, पो. हे. कॉ. सुनिल दामोदरे, पो. हे. कॉ. अनिल जाधव, पो. हे. कॉ. दादाभाऊ पाटील, पो. हे. कॉ. महेश महाजन, पो. हे. कॉ. वसंत लिगायत, पो. हे. कॉ. विलास पाटील, पो. ना. नंदलाल दशरथ पाटील, पो. ना. प्रितम पाटील, पो. ना. प्रमोद लाडवंजारी, पो. ना. किरण धनगर, पो. कॉ. भगवान तुकाराम पाटील, पो. कॉ. पंकज रामचंद्र शिंदे, पो. कॉ. उमेशगिरी गोसावी, चालक सहायल फौजदार इद्रीसखा पठाण, पो. ना. अशोक पाटील, पो. कॉ. मुरलीधर बारी यांनी तपासात सहभाग घेतला.