शिर्डी : साडी नेसून चो-या करणा-या जळगाव येथील चोरट्याला कोपरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिर्डीसह कोपरगाव परिसरात गेल्या काही महिन्यापासून चो-यांचे प्रमाण वाढले होते. याप्रकरणी शिर्डीसह कोपरगाव पोलिस तपास करत होते.
तपासादरम्यान साडी नेसणारी व्यक्ती चोरी करत असतांची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्यानुसार साडी नेसलेल्या व्यक्तीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले असता चोरटा हा जळगावचा तरुण असल्याचे उघड झाले. संजय पाटील (रा. शिवाजीनगर जळगाव) असे कोपरगाव पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे. दुकानातील रोख रकमेसह सामानाची तो शिताफीने चोरी करत असे. उंच असलेल्या जाळीवर देखील तो सहज चढून जात असे. पुढील तपास सुरु आहे.