जळगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत फैजपूर येथील पिता पुत्राचे निधन झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. फैजपूर नजीक पिंपरुड फाट्याजवळ झालेल्या या अपघातात गोपाळ पाटील (66) व खेमा गोपाळ पाटील ( 35) हे दोघे पिता पुत्र ठार झाले आहेत.
दोघे पिता पुत्र यावल तालुक्यातील चिखली येथे मोटार सायकलने गेले होते. शनिवारी फैजपूरला परत येत असतांना अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलल जोरदार धडक दिली. या धडकेत गोपाळ पाटील जागीच मृत्यूमुखी पडले. जखमी खेमा पाटील यास जळगाव येथे उपचारासाठी आणत असतांना वाटेत त्यांचा देखील मृत्यू झाला. फैजपूर पोलिस स्टेशनला या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरिक्षक ठोंबरे करत आहेत.