1414 या क्रमांकाने आवळल्या बोठेच्या मुसक्या

तिन महिन्यापेक्षा अधिक काळ फरार असलेला बाळ बोठे अखेर अहमदनगर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. बाळ बोठे याचा तपास लागण्यात 1414 हा क्रमांक एक महत्वाचा दुवा ठरला आहे. बाळ बोठे याच्या कुटूंबातील प्रत्येक सदस्याच्या मोबाईलमधे शेवटचा क्रमांक 1414 असा आहे. याशिवाय बाळ बोठे याचा अहमदनगर येथील साथीदार महेश तनपुरे याच्या मोबाईल क्रमांकात देखील शेवटचे अंक 1414 असेच असल्याचे पोलिस पथकाच्या लक्षात आले. पोलिसांचे महेश तनपुरे याच्यावर देखील बारकाईने लक्ष होतेच. मात्र अखेरच्या 1414 या त्याच्या मोबाईल क्रमांकाच्या अखेरच्या 1414 या अंकांनी पोलिसांचा त्याच्यावरील संशय अधिकच बळावला. त्यामुळे हे.कॉ. राजेंद्र वाघ आणि संजय खंडागळे या दोघा पोलिस कर्मचा-यांना महेश तनपुरे याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. ती त्यांनी बखुबी निभावली.

महेश तनपुरे हा बाळ बोठे याच्या घरी जावून त्याच्या मोबाईल क्रमांकावरुन त्याच्या कुटूंबियांचे बाळ बोठे याच्याशी बोलणे करुन देत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे अहमदनगर पोलिसांनी महेश तनपुरे याला टारगेट करत त्यालाच अगोदर ताब्यात घेतले. दरम्यान हैद्राबाद येथे हॉटेलात लपून बसलेल्या बाळ बोठे याचे पैसे संपण्यच्या मार्गावर होते. त्याच्याजवळ केवळ अडीच हजार रुपये शिल्लक होते. पकडला जाण्याच्या दुस-या दिवशी महेश तनपुरे हा बाळ बोठे यास एक लाख रुपये त्याच्या खात्यावर जमा करणार होता. मात्र तत्पुर्वीच महेश तनपुरे याचे बाळ बोठे कनेक्शन उघड झाले होते.

हैद्राबाद येथील बिलाल  नगर हे गुन्हेगारांचे आश्रयस्थान म्हटले जाते. याठिकाणी गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावाच लागतो. बाळचे बळ  कमी करण्यासाठी या ठिकाणी पोलिसांनी आपले बळ वापरले. हैद्राबाद येथील उस्मानीया विद्यापिठात असतांना बाळ बोठे याची तेथील अ‍ॅड. जनार्दन चंद्राप्पा याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा बाळ बोठे याने घेतला. बाळ बोठे याने लपण्यासाठी अ‍ॅड. जनार्दन चंद्राप्पा याची मदत घेतली.

अखेर अहमदनगर पोलिसांनी मुंबई आणि हैद्राबाद पोलिसांच्या मदतीने बाहेरुन कुलुप लावून आत लपून बसलेल्या बाळ बोठे याचा ठावठिकाणा लावला. लपून बसलेल्या रुमचे कुलूप तोडून त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. बी.बी. पाटील या नावाने रुम बुक करुन राहणारा बाळ बोठे दाढी वाढवून, ढिला शर्ट परिधान करुन वेगळे नाव वापरुन पोलिसांना गुंगारा देत होता.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here