यावल ( प्रतिनिधी) : तालुक्यातील कोरपावली गावात असलेल्या महालेवाडयात चार कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत. घोषीत करण्यात आलेल्या या प्रतिबंधीत क्षेत्राला सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह आशा कर्मचारी यांनी बाधीत कुटुंबाची भेट घेऊन सविस्तर माहिती घेतली.
10 मार्च रोजी वैद्यकीय अधिकारी डॉ . गौरव भोईटे , वैद्यकीय अधिकारी डॉ .नसीबा तडवी यांनी केलेल्या तपासणीअंती कोरपावली गावात चार हाय रिक्स कोरोना तर 24 लो रिस्क कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळुन आले होते. कोरपावली येथील सरपंच विलास नारायण अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पिरन पटेल, ग्रामसेवक प्रविण सपकाळे, आशा कर्मचारी नजमा अरमान तडवी, हिराबाई सुखदेव पांडव, हसीना सिकंदर तडवी आदींचे पथक प्रतिबंधीत क्षेत्राला नियमित भेटी देत आहेत. आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन त्यांच्याकडून केले जात आहे.