दहिगाव (ता यावल) : यावल तालुक्यातील दहिगाव येथील बावीस वर्षाच्या तरुणाचा खासगी रुग्णालयत उपचार घेतांना कोरोना निगेटिव्ह अहवाल आला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर मात्र त्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या वृत्ताला सावखेडासिम येथील प्राथमीक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. नसीमा तडवी यांनी दुजोरा दिला आहे.
नथु नशिर तडवी यांचा एकुलता एक मुलगा रज्जाक असे मयताचे नाव आहे. त्याला सुरुवातील सावदा येथील गजानन हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह होती. पुढील उपचाराकामी त्याला जळगाव येथील डॉ. डाबी यांच्याकडे दाखल करण्यात आले. त्यावेळी देखील त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. एकुलता एक मुलगा काळाने हिरावून घेतल्यामुळे तडवी कुटूंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. मयत झाल्यावर त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह कसा काय आला असा प्रश्न मात्र ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे.